Marathi Medium
सस्नेह नमस्कार ,
बालक मंदिर संस्थेची पूर्व प्राथमिक शाळा,
दि. १ जुलै १९४९ साली स्थापन करण्यात आली. गेली ५०वर्ष कल्याण पंचकोशीतच नव्हे तर ठाणे जिल्हयात प्रथम सुरू झालेली व कार्यरत असलेली नामवंत शाळा आहे.
कै इंदूताई देवधर व कै. वा. शि आपटे यांनी घरातच शाळा सुरु केली आणि कल्याणमधील नामवंत डॉ. कृष्णाबाई फडके यांच्या हस्ते बालक मंदिर शाळेचे उद्घाटन नवीन विष्णू मंदिरात झाले. विद्यार्थीसंख्या वाढत असल्याने जागेची अडचण लक्षात घेऊन कल्याण गायन समाजाचा हॉल अल्पशा भाड्याने मिळाला आणि जागेची अडचण दूर झाली. सन १९५२ पासून ही शाळा “नलिनी निवास” व “गायन समाज” अशा दोन ठिकाणी सुरू झाली. पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने मुलांची संख्या वाढतच होती पुढे गोडबोले वाडा, गोडसेवाडा, कोतकर वाडा अशा जागा मिळत गेल्या व छोच्या बालक मंदिर शेपटयाचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले.
‘बिज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत’ हे खरे आहे. त्यातच आपणा सर्वांचे सहकार्यरूपी खत मिळाले तर हे बीज फोफावेल असा दृढ विश्वास आहे.
बालशिक्षण हा शिक्षणाचा ‘श्रीगणेशा ‘आहे’ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना त्यांच्या भाषेतच समजेल अशाच प्रकारे शिकविणे महत्वाचे आवश्यक व योग्य आहे.
बालशिक्षण हा शिक्षणाचा श्री गणेशा आहे विद्यार्थ्यांच्चा सर्वागिण विकासासाठी त्यांना त्यांच्या भाषेत समजेल अशाच प्रकारे शिकविणे महत्वाचे, आवश्यक व योग्य आहे धासाठी आम्ही शाळेत भारतीयव पारंपारिक सणाद्वारे त्यांचे महत्व सांगून माहीती करून दिली जाते याबरोबरच राष्ट्रीय सण साजरे करून त्यांच्यात राष्ट्रीयवृत्तीची जोपासना होईल याकडेही लक्ष केंद्रीत असो पाठांतरातून या दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत प्रार्थना व ठूलोक द्वारे गप्पागोन्ही भजन बडबडगीत यातून त्याची भाषाशैली वाढेन तर अंकावर आधारीत असलेल्या खेलरत गणित विषया बघल गार्ड निर्माण होईल वेगवेगळी चित्ते व आकर्षक रंगसंगती याद्वार विद्याथ्यांम चित्तकलेची / हस्तकलेची कावड निर्माण करण्यास उपयोग होळील स्पधेच्या जगायचे जगायचे. म्हणजे त्यागोष्टी स्वता अनुभवणे, समजून घेणे यासाठी शाळेत विद्यार्थ्यांना बसिकसिक इंग्रजी चालू . थोडक्यात समी इंग्लीश चालू . तसेच विज्ञाननाची तोंड ओळख होण्यासाठी गढूळ पाणी स्वच्छ करणे, तरंगणे-बुडणे आवाजातील फरक, साबणाचे फुगे, वासाचे ज्ञान, स्पर्शपान र गोष्टीचे रुपान मुन्नांना होण्यासाठी स्वतः मुलांना हाताळण्यास दिले जाने ‘या इतकेच नाहीतर मुलांनमध्ये सभाधरिपणा वक्तशरि पणा, स्पष्ट उच्चार ई पाठांतर इ. गोष्टी वेगवेगळ्या इयाही गरे मुलांच्या संगीकृत अंगीकृत होण्यामाग होण्यामागे आम्ही सर्वजण मुख्यध्यापक र सर्व सहकारी शिक्षक वर्ग नहमच्चि तत्पर राहू अशी मी सर्वांतर्फे ग्वाही देते.
शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा देऊन माझ्या मनोगतास पूर्णविराम देते.
जोशी.
आपली विश्वासू,
मुख्यध्यापिका.









शाळेचा एकूण पट | 557 |
मुख्याध्यापक | 1 |
शिक्षक | 19 |
लिपिक | 1 |
संस्थापातळीवर शिपाई | 4 |
मा. श्री. रमेश गोरे | अध्यक्ष |
मा. सौ. कल्पना पवार | पदसिद्ध सचिव |
मा. श्री. प्रसाद मराठे | सदस्य |
मा. श्री. दीपक परब | सदस्य |
मा. श्री. राजेश चासकर | सदस्य |
मा. श्री. राजेंद्र फडके | निमंत्रित सदस्य |
मा. श्री.विलास लिखार | शिक्षक प्रतिनिधी |
मा. श्री.भालचंद्र घाटे | शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी |
माझी शाळा तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणखी एक काल सुसंगत पाऊल टाकताना पाहणे हे माझे सौभाग्य आहे. खेळ असो अभ्यास असो अथवा सहशालेय उपक्रम असो कॅ.र.मा.ओक हायस्कूल ही प्रत्येक क्षेत्रात कायमच आघाडीवर असते. शाळेच्या वरिष्ठांनी शाळेकडे नेहमीच याबाबतीत अधिक लक्ष पुरवले आहे. या सर्व काळात शाळेप्रती असलेली माझी निष्ठा आणि शाळेचा उज्ज्वल इतिहास याचा मला विशेष अभिमान वाटतो.
शाळा प्रमुख या नात्याने प्रेरणादायी उपक्रम चालू ठेवणे आणि सहकाठी शिक्षकांमध्ये एकोपा साधणे हेच माझे धोरण असेल. पारदर्शी प्रशासन, शिस्त आणि नावीन्यपणा ही प्रगतीसाठीची आवश्यकता लक्षात घेऊन मी त्यावर लक्ष केंद्रित करीन. या अशा विचारधारेचे परिणाम अतिशय उत्कृष्ट असतात आणि यातूनच मला नवनवीन कल्पना सुचतात.
येणाऱ्या काळात मराठी साहित्य मंडळ, वर्ग वाचनालय इत्यादी चालू करण्याचा माझा मनोदय आहे. शाळा पातळीवर मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास Saturday Film Club सुरू करून तिथे बघितलेच पाहिजे असे चित्रपट दाखवायलाही मला आवडेल. अभ्यास सहली, अभ्यागतांची मार्गदर्शक व्याख्याने घ्यावीत हे देखील माझ्या डोक्यात आहे.
या नवीनच सुरू केलेल्या वेबसाईटमुळे हजारो आजी- माजी विद्यार्थ्यांशी सहज आणि जलद संपर्क वाढेल असे मला वाटते. त्यांच्याकडून मिळणाऱ्या बहुमूल्य सूचनांचे आणि प्रस्तावांचे नेहमीच स्वागत असेल.
मुख्याध्यापक
English Medium
BMS English Medium Pre Primary School established in the year 1986.
Principal: Maria Mascarenhas
Address: Datta Aali, Tilak chowk Kalyan (W.)
Website: www.balakmandir.com
Our Mission
Nurturing young minds with love & care.
Our Vision
To inspire a love for learning that lasts lifetime.
History
Balak Mandir sanstha’s English Medium Pre – Primary School was established on 11th May 1986. The pre-primary section is the pioneer root of this humongous tree that it has successfully grown in the past decades. The Pre-primary section has completed 37 years of service to education while caring for toddlers who feel at home after home at school. Together we look forward to achieving new milestones in the coming years.
B.M.S Pre Primary English Medium School
Nurturing Young Minds, Building Bright Future
Welcome Message
At B.M.S Pre Primary school, we believe that early childhood education is the foundation of a life long love for learning.
Our Pre Primary program is designed to inspire curiosity, foster creativity, and promote holistic development in a nurturing and safe environment.
Why Choose us?
- Experienced educators : qualified and caring teachers who understand the needs of young learners.
- Child-Centered Curriculum: focused on the overall development of social, emotional, physical and cognitive skills.
- Safe & Secure Campus : child-friendly infrastructure with a safe & hygienic environment.
- Learning through play : Innovative teaching methods with a focus on interactive & experiential learning.
- Parent Involvement : opportunities for active participation in your child’s learning journey.
Our Programs
- Playgroup [ Age 2-3 years ] introducing children to a fun & engaging learning environment.
- Nursery [Age 3-4 years] building foundational skills in a structured setting.
- Kg [Age 4-5 years]
- Kg [ Age 5-6 years] preparing children for a smooth transition to primary school.
Key Features
- Activity – Based Learning : Hands – on activities that stimulate creativity & problem – solving skills.
- Language Development : Early exposure to reading, storytelling & phonics.
- STEM for Young Minds: Age- appropriate Engilsh, Math concept, G.K ,Marathi, Art & craft including various activities.
- Cultural exposure : Celebrating Festivals, Events & diversity
Facilities
- Bright & colorful Classrooms
- Indoor & Outdoor play areas
- Age-appropriate furniture: Low tables, chairs & shelves for easy access.
- Audio-video visual learning tools.
Admission Process
- Enquiry & Registration: visit the school office (enquires can also be done via contact no.)
- Campus tour : Meet our teachers & explorer the learning Environment.
- Interaction Session : a friendly interaction with the child & parents.
- Confirmation : complete the admission formalities & secure your child’s spot.
Important Dates
Admissions open from January 2025
Contact us
Address: Royal Palace near city post office, Tilak Chowk, Kalyan (w)
Phone No: 91-8976028486
Follow us: balakmandir.com
Facebook: bmsenglishschoolkalyan | Instagram: bmsenglishschoolkalyan
Name of the Section – Balak mandir Sanstha (1/07/1949)
Name of the school -Balak mandir English Medium Primary School.
Established – 9/06/1986
TOTAL NUMBER of Students Now 623.
Progress of School and always shine and achieve 100% Result achieve Sparkle in M.P.S.P. Scholarship exam, English Marathon, Raghukul trust Competition.
Many Students Participated in K.D.M.C organized competition and won Prizes.
- Many Students Participates in interschool Competition and won Prizes.
- The School aims at Intellectual, cultural and Social development of all Students in Contact of Mutual respect and responsibility.
- Our Students learn from an experience and dedicated enormously talented faculty who challenges inspired nurture. encourage and nurture.
- There is strong tradition of wild range of extra -curricular activites sports and outdoor visit in school.
- Special projects and programs organized for students.
- Celebrations of traditional and national festival,
- Exhibition swachchata feri (cleanliness drive Vrikshadindi
- Valuable and educational movies were arranged.
- Many sports activities were arranged for students
- Building and solid foundation for our students extends beyond developing literacy and numeracy skills.
- Extra ordinary opportunities to achieve, learn and grow.
Our education extends beyond four walls of the classroom.
BMS English Medium School established in the year 1986.
Principal: Mrs Kanchan Ingole
Address: Datta Aali, Tilak chowk Kalyan (W.)
Website: www.balakmandir.com
Co-ed status: Co education
Our Mission
BMS SCHOOL provide our students the best opportunities for enhancing their potentials in various skills.
Our Vision
Our vision is to develop well rounded, BB confident and responsible individuals, we will do this by providing a happy safe and supportive learning environment in which everyone is equal.
History
Balak Mandir English Medium school was founded in 1986, with the blessings of Mrs, Indutai Apte (Devdhar) managed by our Commitee members.
Affiliated by Maharashtra State Board of secondary Education, the School today has on its 540 students in secondary section , offering High quality education, emphasizing in all round development of students through benchmarked best practices. The school has come a long way,since it’s inception.
Rural Tribal Schools
तलासरी तालुक्यातील महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर गिरगाव आरजपाडा येथे बालक मंदिर संस्थेने सन २००० साली गिरगाव माध्यमिक विद्यालय सुरु केले. एकोणीस वर्षाअगोदर गिरगाव व गिरगाव लगतच्या गावात धीमानिया, डोंगारी, आमगाव येथे एकही माध्यमिक शाळा नव्हती. गिरगाव व गिरगाव लगतच्या गावात फक्त जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या. तेथे फक्त जेमतेम मुलामुलींचे सातवी पर्यंतचेच शिक्षण होत होते. पुढे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना १८ किमी दूर तलासरी येथे जावे लागत होते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता येत नव्हते. या गिरगाव गावात माध्यमिक शाळा असणे हि काळाची गरज बनली होती..
सन २००० साली बालक मंदिर संस्थेने गिरगाव गावात गिरगाव माध्यमिक विद्यालय नावाची शाळा एका उबदार झोपडीत भरविण्यात आली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश हा शासनाचा अलीकडचा उपक्रम हा अठरा वर्षाअगोदर गिरगाव शाळेत सुरु झाला. गिरगाव शाळेत प्रत्येक मुल शाळाबाह्यच होते. या प्रत्येक शाळाबाह्य मुलाला गिरगाव शाळेने शिकतं करून प्रत्यक्षात ज्ञानरचनावादात सजविले. इयत्ता ८ विला ४२ विद्यार्थ्यांनी सुरु झालेली शाळा हळूहळू मोठी झाली. उबदार झोपडीत उघडलेली गिरगाव शाळा पाच वर्षात जीर्ण झाली. त्यामुळे कधी श्री. रमेश जोशींच्या वाडीत तर कधी त्यांच्या चाळीत भरत होती आणि एकदाची कारूळकर संकुलात स्थिर झाली.
शाळेतील अध्यापन पद्धती, शाळेत होणारे विविध शालेय व शाळाबाह्य उपक्रम हे पाहून विद्यार्थी संख्या वाढत गेली. बालक मंदिर संस्थेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी सुसज्ज भव्य इमारत बांधली. विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरणात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. शाळेत विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, हवेशीर वर्गखोल्या व सुसज्ज असे खेळाचे मैदान उपलब्ध करून दिले आहे.
आज बालक मंदिर संस्थेने लावलेल्या छोट्याशा रोपट्याच रुपांतर वटवृक्षात झाले आहे. कोणत्याही गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा संस्थेचा मानस असून प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जातो. १० वी नंतर पुन्हा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले कारण ११ वी, १२ वी साठी तलासरी किवा डहाणू येथे जावे लागणार? विद्यार्थी व पालकांची गरज लक्षात घेता संस्थेने २०१३ साली कला व वाणिज्य शाखेचे ज्युनिअर कॉलेज सुरु केले. अनेक गावातील विद्यार्थी आपल्या शाळा व कॉलेजमध्ये शिक्षणाचा लाभ घेत आहेत. माध्यमिक विभागात ३१० विद्यार्थी व ज्युनिअर कॉलेज कला व वाणिज्य शाखेत २२० विद्यार्थी असे एकूण ५३० विद्यार्थी अध्ययन करीत आहेत.
शाळेत येणारे विद्यार्थी हे अनेक गावातून पाड्यावरून चालत शाळेत येतात. ९९% विद्यार्थी हे आदिवासी समाजातील आहेत. इयत्ता ८ वी व ९ विला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बोलीभाषा वेगळी असल्याने विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी भाषा समजणे व बोलणे कठीण जाते. परंतु विद्यार्थ्यामध्ये असलेली शिस्त, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा इत्यादी गुणांचे दर्शन घडते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शाळेतील प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रयखजीन असतो. विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, शिस्त रुजविण्याचे कार्य शिक्षक नेहमीच करत असतात. जसे शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षक प्रयत्न करतात तसेच विद्यार्थ्यांच्या सुम गुणांना वाव देण्यासाठी शाळेत L & T व प्रथम एज्युकेशन मार्फत अनेक शैक्षनिक उपक्रम व शिबीर आयोजित केले जातात. क्रीडाक्षेत्रात हि विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत मजल गाठली आहे. शाळेतील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात तसेच क्रीडाक्षेत्रात हि अग्रेसर आहेत. शाळेचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस वाढत आहे. विद्याथ्याँचा गुणात्मक व प्रमाणात्मक दर्जाही वाढला आहे. शाळेला वेळोवेळी माजी विद्यार्थी, पालक शिक्षक संघ, पालक मदतीसाठी सक्रीय असतात. आज शाळा अनेक गुणवंत विद्यार्थी घडवून समाज परिवर्तनाचे साधन बनले आहे.
शाळेत अद्यावत प्रयोगशाळा असून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग प्रयोगशाळेत दाखविले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांची विज्ञान विषयात आवड निर्माण होते. विद्यार्थी स्वतः प्रयोग करतात त्यामुळे त्यांची जिज्ञासा वृत्ती वाढते.
श्री. प्रदीप गणपत खरपडे हा १० वी २००५ बेचचा विद्यार्थी असून शिक्षण एम.ए. बी. एड. मराठी या विषयात झाले असून २०१४ सालापासून गिरगाव माध्य. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज विभागात सहा. शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
श्री. मंगेश मंजी अंधेर हा १० वी २००६ बेचचा विद्यार्थी असून शिक्षण एम.ए. बी. एड. अर्थशास्त्र या विषयात झाले असून २०१५ सालापासून गिरगाव माध्य. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज विभागात सहा. शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
श्री. सदानंद प्रभू धोडी १० वी चा पहिल्या बेचचा विद्यार्थी असून शिक्षण डिप्लोमा इन शिपिंग मध्ये झाले असून आज तो पूर्ण जग फिरतो. गिरगाव खेडेगावातील विद्यार्थी असून आज त्याने पूर्ण जग पहिले आहे.
कुमारी कल्पना गोविंद धोडी हिचे बी. एस्सी. बी. एड. झाले असून आज ती आश्रम शाळेत कायम स्वरूपी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
आज अनेक विद्यार्थी आश्रम शाळेत तसेच जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
कुमारी कल्पना भास्कर डोल्हारे हिचे शिक्षण १२ वी कला पर्यंत झाले असून माध्यमिक शाळेत असताना एकलव्य खेलकुद स्पर्धेत १०० मी धावणे स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आणि आज ती पोलीस म्हणून सफाळे येथे कार्यरत आहे.
अनेक विद्यार्थी हे रेल्वे विभागात अनुकंपतत्वावरती नोकरीला आहेत. अनेक माजी विद्यार्थी राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. श्रीम. गीता बाबुराव घोरखाना हि गिरगाव गावची सरपंच व श्रीम. शीतल विनोद धोडी हि घीमानिया गावचे सरपंच आहेत.